Sat. Dec 6th, 2025

श्वानामुळे वाचला 67 लोकांचा जीव, नेमकं काय घडलं? वाचा…

काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सियाठी गावात भूस्खलन झाले होते. यामुळे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. मात्र या घटनेत एका श्वानामुळे तब्बल 67 लोकांचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेपूर्वी एका श्वानाने दिलेल्या इशाऱ्यामुळे लोकांचा जीव वाचला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 जूनच्या रात्री सियाठी गावात मुसळधार पाऊस पडत होता. गावातील लोक आरामात झोपले होते. मात्र त्या रात्री एका घरातील दुसऱ्या मजल्यावर असलेला एक श्वान अचानक जोरजोरात भुंकू लागला, यामुळे कुंटूंबीयांना जाग आली. लोक सुरुवातीला घाबरले, मात्र त्यांना घराच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसले. यामुळे घरात पाणी भरायला सुरुवात झाली होती.

IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं मोठं संकट; पुढील 24 तास धोक्याचे, एनडीआरएफच्या टीम सज्ज, 11 जिल्ह्यांना हाय अलर्ट

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आजचे राशीभविष्य 10 July 2025 : आज मिळणार गुड न्यूज, कुटुंबात नवा पाहुणा येणार .. वाचा आजचं राशीभविष्य !

Horoscope Today 10 July 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

Devendra Fadnavis : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता ‘सिंदूर उड्डाणपूल’, मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

दक्षिण मुंबईतील नूतनीकरण केलेल्या कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता ‘सिंदूर उड्डाणपूल’ असे ठेवण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या नावात बदल केला असून, हे नाव भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईपासून प्रेरित आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या पुलाचे उद्घाटन आज फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करत काळ्या इतिहासाच्या पानांचा संदर्भ दिला.

हा पूल दक्षिण मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडतो. यापूर्वी हा पूल कर्नाक पूल म्हणून ओळखला जात होता, ज्याचे नाव 1839-1841 दरम्यान मुंबई प्रांताचे राज्यपाल जेम्स रिव्हेट कर्नाक यांच्यावरून ठेवण्यात आले होते. आता ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ या पुलाला ‘सिंदूर पूल’ असे नाव देण्यात आले आहे.

Girish Mahajan : शिक्षकांच्या आंदोलनाला यश, मंत्री गिरीश महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत…

मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन प्रामुख्याने विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी वाढीव अनुदान मिळावं या मागणीसाठी आहे. दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आल्यानंतर या आंदोलनात आता मंत्री गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली आहे. विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा होईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं. यामुळे आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश आल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे ते असेही म्हणाले की, ‘आता तुमच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तुमच्या शिक्षकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे ठरलं की दोन-तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊन, येत्या 18 तारखेला अधिवेशन संपल्यावर तुमच्या खात्यात पैसे आलेले असतील. यात कोणताही बदल होणार नाही.’